मुंबई, दि. 8 : तेलगू सिनेमातील प्रसिद्ध अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे वयाच्या 74 व्या वर्षी गुंटूर (आंध्रप्रदेश) या ठिकाणी मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी अनेक वर्ष तेलगू सिनेमा आणि थिएटरसाठी काम केले आहे. तेलगू देशम पार्टीचे प्रमुख एन चंद्रबाबू नायडू यांनी जयप्रकाश यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.
‘जयप्रकाश रेड्डी गारा यांच्या जाण्याने तेलुगू सिनेमा आणि थिएटरने आज एक हिरा गमावला आहे. त्यांना विविध ढंगी परफॉरमन्सने गेल्या काही दशकात आम्हाला सर्वांना काही आठवणीतील सिनेमॅटिक क्षण दिले आहेत. मी त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या दु:खात सहभागी आहे.’ असे ट्विट करत चंद्राबाबू यांनी श्रद्धांजली वाहिली आहे

No comments:
Post a Comment